विशेष

दीपावलीच्या पूर्वसंध्येला शहा गाव दिव्यांनी उजळले.

सरपंच दिलीप पाटील यांच्या पुढाकाराने गावात लावले शेकडो दिवे; ग्रामस्थांचा कृतज्ञतेचा वर्षाव.

इंदापूर,दि.१७

  • इंदापूर तालुक्यातील शहा गाव यंदा दीपावलीच्या पूर्वसंध्येलाच प्रकाशमय झाले. गावचे सरपंच दिलीप पाटील यांनी स्वतः लक्ष घालून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील मुख्य रस्ते, वाड्या-वस्ती आणि लोकवस्ती असलेल्या भागात शेकडो दिवे बसवले, ज्यामुळे संपूर्ण गाव दिवाळीच्या प्रकाशात न्हाऊन निघाले आहे.

सालाबादप्रमाणे यावर्षीही सरपंच पाटील यांनी प्रत्येक खांबावर नवीन बल बसवून गावाच्या सौंदर्यात भर घातली. दीपोत्सवाच्या निमित्ताने गाव लखलखीत आणि आकर्षक बनले असून ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव झळकले आहेत.

गावाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असलेले दिलीप पाटील हे शहा गावाला सुशिक्षित, स्वच्छ आणि प्रगतिशील बनविण्याचे स्वप्न पाहणारे नेतृत्व आहे. ते गावातील अडीअडचणी तत्परतेने सोडवतात आणि प्रत्येक कामात जनतेचा सहभाग ठेवतात.शहा ग्रामस्थांनी यावेळी सरपंच दिलीप पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले, कारण त्यांच्या पुढाकारामुळे दीपावलीपूर्वीच गाव उजळले.

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत इंदापूर तालुक्यातील वडापुरी-माळवाडी गटात “दिलीप पाटील ” यांचे जिल्हा परिषदेसाठी नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. गावाच्या सर्वांगीण विकासामुळे त्यांची राजकीय वाटचाल अधिक बळकट झाल्याचे निरीक्षकांचे मत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!