विशेष
कमल विद्यालयाचे शिक्षक प्रा.तुकाराम गंगावणे सर यांचा जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

इंदापूर,दि.८
- शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न आणि शैक्षणिक उपक्रमातील सातत्यपूर्ण योगदान याची दखल घेऊन बाभुळगाव येथील कमल विद्यालयाचे शिक्षक प्रा.तुकाराम गंगावणे (सर) यांना जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रा.तुकाराम गंगावणे सरांनी आपल्या अध्यापनातील वेगळेपणा, नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच समाजाभिमुख दृष्टीकोन यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक तसेच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
हा पुरस्कार प्राप्त झाल्याने गंगावणे सरांच्या कार्याचा गौरव झाला असून शिक्षक समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे. शहा व बाभुळगाव ग्रामस्थ, सहकारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीही त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.



