Baramati murder/बारामती मधील शेरीचीवाडी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातवाला अटक.

इंदापूर,दि ५
- बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावातील शेरेचीवाडी येथे 29 सप्टेंबर रोजी झालेल्या दोन ज्येष्ठ महिलांच्या हत्येचा उलगडा झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मृत महिलांचाच 26 वर्षीय चुलत नातूला अटक केली आहे.विकास राजेंद्र लडकत (रा. शेरेचीवाडी, बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
इंदूमती लडकत (75) आणि कृष्णाबाई लडकत (55) या दोन्ही महिलांची घरातच निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने गायब असल्याने सुरुवातीला चोरीच्या उद्देशाने दरोडेखोरांनी हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात वेगळीच धक्कादायक माहिती समोर आली.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी 10 अधिकारी आणि 55 पोलीस कर्मचाऱ्यांची पथके काम करत होती. परिसरात पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आरोपीपर्यंत पोहोचणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक तपासासोबतच स्थानिक पातळीवर माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. त्यानंतर विकास लडकत याच्यावर पोलिसांचा संशय बळावला आणि पहाटेच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत कर्जाचा वाढता बोजा आणि पैशांची गरज असल्याने गुन्हा केल्याचे त्याने सांगितल्याची माहिती सुपे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत शेळके यांनी दिली.
सदरची कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके कार्यरत होती.
या गंभीर घटनेच्या तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती शहर पोलीस निरीक्षक शैलेश चिवडशेट्टी आणि सुपा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या कारवाईत सपोनि महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पोलीस उपनिरीक्षक युवराज धोंडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राजूत, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कांरडे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, पोलीस उपनिरीक्षक उदय पवार, पोलीस उपनिरीक्षक कदम, पोलीस अंमलदार शिवाजी निकम, सचिन घाडगे, असिफ शेख, दीपक साळवे, संतोष तोंडकर, राजू मोमीन, किशोर तेलंग,गणेश डेरे, तुषार चव्हाण,शैलेश स्वामी, गुलाब पाटील, अजय घुले, योगेश नागरगोजे, स्वप्नील अहिवळे, निलेश शिंदे, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राजूत, विकास कापरे, अक्षय यादव, विशाल भोराडे, महेश खरात, संतोष भापकर, अमोल शेंडो, सुलतान डांगे, रोहिदास मुलाणी, संदीप वारे, अक्षय नवले, अभिमन्यू मोटे, अतुल डेरे, चेतन पाटील यांचा सहभाग होता.
तसेच सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार महेंद्र गायकवाड, रुपेश साळुंखे, राहुल भाग्यवंत, संदीप लोंढे, विशाल गजरे, संतोष जावीर, तुषार जैनक, किसन ताडगे, महादेव साळुंखे, सचिन दरेकर, निहाल बनवे, भाऊसाहेब चौधरी, आदेश माळक, योगेश सरोदे, पीयूष माळी, ऋषिकेश वीर, अश्विनी चांदगुडे, प्रणाली भोसले, तसेच बारामती शहर पोलीस ठाणे, बारामती तालुका पोलीस ठाणे आणि दौंड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तपासात सहभाग घेतला.



