देश-विदेश
Trending

CJP Protest: नागपूरचा आदित्य दिल्लीतील लाठीमारात गंभीर जखमी, तरुणाचे आई-वडील पोलिसांवर संतापले.

CJP Protest:-पुणे,दि २१. दिल्लीत जंतर-मंतर (Jantar Mantar) परिसरात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर (Students) दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केलेल्या अमानुष लाठीचारात नागपूरचा (Nagpur) तरुण आदित्य बानाईत हा गंभीर जखमी झाला आहे.

  • पोलिसांकडून त्याला झालेल्या बेदम मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असून या घटनेनंतर नागपुरातील बानाईत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर आदित्यचे वडील कमलाकर बानाईत आणि आई वनिता बानाईत यांनी तीव्र शब्दांत या घटनेचा निषेध नोंदवला असून, दोषी पोलिसांवर तत्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आपल्या मुलाला झालेल्या अमानुष मारहाणीवर भाष्य करताना आई-वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले होते. संताप व्यक्त करताना ते म्हणाले, “माझ्या मुलाला ज्यांनी मारले ते त्यांच्या मुलांना तशी मारहाण करू शकतात का? देशातील कोणत्याही मंत्र्यांच्या मुलांना अशी बेदम मारहाण होऊ शकते का?” असा थेट आणि रोकडा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी आणि एकाही मंत्र्याने त्यांची भेट न घेता, उलट मुलांवर पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला, याबद्दल त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला.

मुलावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतरची भयंकर आपबिती सांगताना त्याची आई म्हणाली, “सुरुवातीला तो व्हिडीओ पाहिला तेव्हा मला वाटले की पोलिसांकडून फक्त दोन-चारच काट्या मारल्या गेल्या असतील. पण जेव्हा मी पुन्हा तो व्हिडीओ बारकाईने पाहिला, तेव्हा मला प्रचंड त्रास झाला. तब्बल 10 ते 15 पोलिसांनी एकत्र येऊन माझ्या मुलाला बेदम मारहाण केली आहे, त्याचे डोकं फोडलं आहे आणि पूर्ण शरीरावर गंभीर मार दिला आहे. या पोलिसांवर तात्काळ कडक कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

मुलाशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणाबाबत विचारले असता, बानाईत याच्या आईने सांगितले की, “त्याच्याशी बोलणे झाले असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. संपूर्ण शरीरभर मार लागल्याने तो प्रचंड वेदनेत आहे,” असे त्यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!