राजकीय

काटी–लाखेवाडी जिल्हा परिषद गटात श्रीमंत ढोले यांची घोडदौड; वाढता जनसमर्थन पाहून विरोधक हतबल!

इंदापूर दि,१

  • काटी–लाखेवाडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत ढोले यांना मतदारांचा दिवसेंदिवस वाढता पाठींबा मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. गावोगावी होत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नागरिकांकडून मिळणारे जाहीर स्वागत यामुळे ढोले यांची प्रचारफेरी लोकचर्चेचा विषय ठरत आहे.

श्रीमंत ढोले यांच्या विकासकामांचा प्रभाव थेट मतदानावर दिसून येत असून, “काम बोलते” हीच भावना मतदारांमध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. मागील काळात रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधांसाठी केलेल्या ठोस कामांमुळे मतदारांनी ढोले यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

ढोले यांच्या प्रभावी प्रचारामुळे आणि वाढत्या जनसमर्थनामुळे विरोधकांची प्रचारयंत्रणा पुरती गोंधळलेली असून अनेक ठिकाणी विरोधक हतबल झाल्याचे चित्र आहे. काटी, लाखेवाडी तसेच परिसरातील गावांमध्ये ग्रामस्थ स्वतःहून पुढे येत ढोले यांचे स्वागत करत असल्याने वातावरण पूर्णतः ढोलेमय झाले आहे.

विशेष म्हणजे, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या मनातील इंदापूर तालुक्यातील जाहीर झालेला पहिला जिल्हा परिषद उमेदवार म्हणून श्रीमंत ढोले यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे ढोले यांना केवळ स्थानिकच नव्हे तर तालुकास्तरीय राजकीय वजनही लाभले आहे.

एकूणच काटी–लाखेवाडी जिल्हा परिषद गटात विकास, विश्वास आणि नेतृत्व या त्रिसूत्रीवर श्रीमंत ढोले यांची उमेदवारी मजबूत होत असून, चालू असलेल्या निवडणुकीत विजयाची शक्यता अधिकाधिक बळावत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत ढोले यांच्या प्रचार दौऱ्यात प्रत्येक गावात नागरिक स्वतःहून पुढे येत स्वागत करत आहेत. महिला, युवक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक सर्व घटकांमधून मिळणारा प्रतिसाद पाहता विरोधकांची रणनीती पुरती कोलमडली आहे. वाढत्या जनसमर्थनामुळे विरोधक हतबल झाले असून त्यांच्या प्रचारात उत्साहाचा अभाव जाणवत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!