राजकीय

इंदापूर चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत (सेठ) शहा यांनी पदभार स्वीकारला.

इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासाचा करण्याचा भरत (सेठ) शहा यांचा निर्धार.

इंदापूर,दि.२४

  • इंदापूर नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करत भरत (सेठ) शहा यांनी जनतेतून नगराध्यक्ष म्हणून दणदणीत विजय मिळवला असून त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे.

मागील कार्यकाळात तत्कालीन नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी इंदापूर शहराच्या विकासासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलला. पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांनी केलेली विकासकामे नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरली. त्याच विकासाच्या भक्कम पायावर आणि जनतेच्या सतत मदतीला धावून जाणाऱ्या नेतृत्वाच्या जोरावर भरत (सेठ) शहा यांना पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.

नवीन कार्यकाळात इंदापूर शहरातील सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवणे, वाढत्या शहराचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधणे, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण अशा मूलभूत बाबींना गती देणे, तसेच शहराला राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळवून देत इंदापूरचा नावलौकिक वाढवण्याचा संकल्प भरत (सेठ) शहा यांनी व्यक्त केला आहे.

इंदापूर शहराला पुन्हा एकदा विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा विश्वास व्यक्त करत भरत (सेठ) शहा यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांमध्ये अपेक्षा वाढल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!