इंदापूरमध्ये भरत शहा यांच्या नावाची जोरदार चलती.

इंदापूर,दि.२६
- आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर शहरात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे घड्याळ चिन्हावरील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा. गेल्या काही दिवसांपासून शहरात, प्रभागांत, व्यावसायिक भागांमध्ये आणि बोलीभाषेतसुद्धा “भरत शहा” यांची नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
तळागाळातील जनतेशी जोडलेले नेतृत्व म्हणून भरत शहा यांची ओळख वर्षानुवर्षे दृढ झाली आहे. शहरातील सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात नेहमी उपस्थित राहणारा, संपर्कात राहणारा आणि तत्पर मदत करणारा नेता म्हणून त्यांचा परिचय अधिक मजबूत झाला आहे. त्यामुळेच निवडणूक जाहीर होताच शहा यांना सर्व समाजातून मिळणारा प्रतिसाद अधिकाधिक वाढताना दिसत आहे.
शहरातील विविध भागांत भरत शहा हे थेट जनतेशी संवाद साधत आहेत. घरदारी मतदार संपर्क, व्यापारी भागातील बैठक, तरुणांसोबत चर्चा, महिलांसाठी विशेष संवाद अशा विविध माध्यमातून ते नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. या थेट संवाद मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, अनेक ठिकाणी गर्दी उसळत असल्याचे चित्र दिसत आहे.
भरत शहा यांच्या नावाला मिळणाऱ्या या जनसमर्थनात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे राजकीय पाठबळ महत्त्वाचे ठरत आहे. या तिन्ही वरिष्ठ नेत्यांचे समर्थन मिळाल्याने शहा यांची उमेदवारी अधिक मजबूत बनली असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
शहरातील विविध समाजघटक, व्यावसायिक, महिला वर्ग, तरुण मंडळी आणि वयोवृद्ध नागरिक यांच्याकडून भरत शहा यांना जोरदार पाठिंबा मिळत आहे. नागरिकांचे म्हणणे एकच — “भरत शहा हे इंदापूरच्या विकासासाठी योग्य नेतृत्व आहे”. अनेक ठिकाणी होत असलेल्या चर्चेतूनही त्यांचा विजय निश्चित असल्याचे मत व्यक्त होत आहे.
इंदापूर नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत भरत शहा यांची आघाडी निर्विवाद दिसत असून आगामी काही दिवसांत हा उत्साह आणखी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



