इंदापूर नगरपालिकेच्या प्रभाग क्र. ५ मध्ये अनिल राऊत आणि दिपाली राऊत यांचे नाव आघाडीवर!

इंदापूर,दि ५
- इंदापूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ मध्ये सध्या राऊत परिवाराचे नाव चर्चेत आहे. माजी नगरसेवक अनिल शिवाजी राऊत हे पुरुष उमेदवार म्हणून दिपाली दादाराम राऊत या महिला उमेदवार म्हणून मतदारांच्या पसंतीच्या यादीत अग्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे.
अनिल शिवाजी राऊत यांनी २००२ ते २००७ या कालावधीत नगरसेवक म्हणून कार्य केले असून, २०१३ ते २०२३ या दहा वर्षांच्या कालावधीत त्यांनी इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला आहे. सध्या ते पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे खंदे समर्थक मानले जातात. तसेच ते जय भवानी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिकांच्या समस्यांवर त्यांनी सातत्याने काम केले असून त्यांच्या कार्याची चर्चा जनतेत कायम आहे.
दरम्यान, या प्रभागात सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले दादाराव राऊत यांच्या पत्नी दिपाली राऊत तसेच संगीता नारायण राऊत यांचेही नाव महिलांच्या उमेदवारीसाठी पुढे येत आहे. खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक ५ मध्ये उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झाल्याचे संकेत मिळत असून, पुरुष उमेदवार म्हणून अनिल राऊत आणि महिला उमेदवार म्हणून दिपाली राऊत किंवा संगीता राऊत यांपैकी एकाची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या सर्व घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक ५ मध्ये राऊत परिवाराचे राजकीय समीकरण अधिक बळकट झाले असून, मतदारांचा मोठा प्रतिसाद या उमेदवारांना मिळत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.



