वडापुरी-माळवाडी ZP गटात “DJ” दीपक जाधव यांची जोरदार चर्चा.
वडापुरी-माळवाडी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा एकमताने पाठिंबा!

इंदापूर,दि.२४
- इंदापूर तालुक्यातील वडापुरी-माळवाडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे तरुण आणि लोकप्रिय चेहरा म्हणून दीपक (DJ) जाधव यांचे नाव चर्चेत आहे. सामाजिक कार्य, लोकसंपर्क आणि तरुणाईशी घट्ट नातं यामुळे दीपक जाधव यांची ओळख “जनतेचा माणूस” अशी झाली आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी ग्रामविकास, शिक्षण, खेळ आणि शेतकरी समस्यांवर सातत्याने काम केले आहे. प्रत्येकाच्या अडीअडचणीत मदतीचा हात पुढे करणारे जाधव हे युवकांमध्ये प्रेरणास्थान बनले आहेत.
“DJ” या नावाने संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध असलेले दीपक जाधव हे तरुण उद्योजक म्हणून पुणे जिल्ह्यातही नावलौकिक प्राप्त करत आहेत. त्यांची कार्यशैली आणि लोकसंपर्क पाहता वडापुरी-माळवाडी गटात उमेदवारी मिळाल्यास विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतो.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की “दीपक जाधव हे जमिनीशी जोडलेले नेते आहेत; त्यांना संधी दिल्यास वडापुरी-माळवाडीचा विकास अधिक वेगाने होईल.
“दीपक जाधव हे खऱ्या अर्थाने जनतेचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी सातत्याने सामाजिक व जनहिताचे प्रश्न अग्रक्रमाने मांडले आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांना जिल्हा परिषद उमेदवारी द्यावी, यासाठी आम्ही लवकरच पक्ष नेतृत्वाची भेट घेणार आहोत.
युवा नेते लक्ष्मण (तात्या) देवकाते.



