राजकीय

प्रवीण माने यांचा लवकरच भाजप प्रवेश.

इंदापूर विधानसभेसाठी भाजपचा चेहरा.?

इंदापूर,दि.२१

  • राज्यामध्ये सध्या इतर पक्षांमधून भाजपमध्ये येणाऱ्यां नेत्यांचा ओघ अधिक वाढला आहे. त्यातच इंदापूर मध्ये विधानसभेची अपक्ष निवडणूक लढविलेले प्रवीण माने हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणारा अशी चर्चा सुरू असून सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चे फोटो वायरल झाल्याने भाजप प्रवेशाला अधिक पुष्टी मिळाली आहे. प्रवीण माने यांचा भाजप प्रवेश पुढच्या आठवड्यात २४ ते २८ तारखेच्या दरम्यान होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

प्रवीण माने यांनी गेली विधानसभा निवडणूक इंदापूर मधून अपक्ष म्हणून लढवली आहे. तसेच त्यांचा तालुक्यात दांडगा जनसंपर्क असून त्यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती पद भूषविले आहेत. तसेच सोनाई परिवाराच्या माध्यमातून त्यांनी इंदापूर तालुक्यात अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार देऊन आपली ओळख निर्माण केली आहे.

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या निवडणुकांमध्ये इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पक्ष अधिक सक्षम करत कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी प्रवीण माने यांचा भाजप प्रवेश तात्काळ करून घेणे हे भाजप पक्षातील नेत्यांचे धोरण असून त्याच धोरणाप्रमाणे सध्या प्रवीण माने यांचा प्रवेश होणार आहे.

२०२९ मध्ये होणारी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुती मधून बाहेर पडून स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याचे राजकीय जाणकाराचे मत असून इंदापूर विधानसभेसाठी प्रवीण माने हेच भाजपचे उमेदवार असतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तविला जात आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षाची विधानसभेची तयारी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रवीण माने यांना वेळ देऊ इच्छित असल्याचे बोलले जात आहे.

प्रवीण माने यांच्या भाजप प्रवेशासाठी दौंड चे आमदार राहुल कुल यांनी मध्यस्थी केली असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!