राजकीय
इंदापूर मधील आपले मेंबर अनिल(आण्णा) पवारांचे ठरले; यंदा तुतारी वाजवायची.
इंदापूर,दि.१९
- इंदापूर तालुक्यामध्ये जसजशी विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे. तस तशी रंगत वाढू लागली आहे. त्यातच इंदापूर शहरातील जनतेच्या मनातील आपले मेंबर अनिल (आण्णा) पवार यांनी आज आपल्या समर्थकांच्या उपस्थितीत निर्णय घेतला असून ते यंदा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना साथ देत तुतारी वाजवणार आहेत.
इंदापूर शहरात आपले मेंबर म्हणून परिचित असलेले अनिल (आण्णा )पवार यांनी सामाजिक क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात आपला ठसा आणि वर्षांपासून उमटवला आहे. सर्वसामान्यांपासून जेष्ठांपर्यंत अनिल अण्णा यांच्या बद्दल प्रचंड प्रेम कायम दिसून आले आहे. त्याच अनिल अण्णा यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या समर्थकांची बैठक घेऊन तुतारी वाजवण्याचा निर्णय घेतलाय.
इंदापूर शहरात अनिल अण्णा पवार यांना मानणारा मोठा चाहता वर्ग आहे. अनिल अण्णा जे सांगतील तीच पूर्व दिशा असे त्यांचे समर्थक कायम मानत आले आहेत. त्याच अनिल अण्णा पवार यांनी आज अखेर आपला मोठा निर्णय जाहीर केला असून ते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना साथ देत इंदापूर मध्ये तुतारी वाजवणार आहेत.