सामाजिक

सामाजिक बांधिलकी जपत यशाची भरारी; ब्रँड ९०९० चे युवा उद्योजक अक्षय भोई यांची वेगळी ओळख.

इंदापूर,दि २०

  • अल्पावधीत उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत सामाजिक कार्यातही मोलाचे योगदान देणारे ब्रँड ९०९०चे युवा उद्योजक अक्षय भोई आज सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. व्यावसायिक प्रगतीसोबतच समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

युवा उद्योजक अक्षय भोई यांनी आपल्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीबरोबरच समाजातील गोरगरीब, अंध, अपंग, निराधार आणि गरजू नागरिकांना वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे. शिक्षणाची आर्थिक अडचण असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फी आणि इतर आवश्यक मदत करून त्यांनी अनेक कुटुंबांना आधार दिला आहे.

सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग, गरजूंना तातडीची मदत आणि कोणताही गाजावाजा न करता केलेले कार्य यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आदराची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे विविध स्तरांतून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

अल्पावधीत उद्योगविश्वात मोठी भरारी घेत असतानाच समाजसेवेचा ध्यास कायम ठेवणारे अक्षय भोई हे पश्चिम महाराष्ट्रातील उदयोन्मुख युवा उद्योजक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. उद्योग, सामाजिक जबाबदारी आणि युवा नेतृत्व यांचा समतोल साधत त्यांनी अनेक तरुणांसमोर एक सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!