इंदापूर हादरलं! अल्पवयीन निर्भयेवर अत्याचार; भाटनिमगावातील संतापजनक घटना.
स्विफ्ट कारमध्ये नेऊन अल्पवयीन निर्भयेवर अत्याचार?

इंदापूर,दि.२९
- इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथे अल्पवयीन निर्भयेवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणी अमीर महमद सय्यद (रा. भाटनिमगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल झालेल्या फिर्यादीवरून, निर्भया हीचे वय वर्षे १६ वर्षे ८ महिने असून अल्पवयीन आहे. तसेच ती हिंदू समाजातील आहे. निर्भयाच्या घरी जाऊन सदर आरोपीने “तु मला खूप आवडतेस” असे म्हणत तिचा हात धरून अंगाकडे ओढत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप आहे.
तसेच चालू महिन्यात निर्भयेचा इयत्ता ११ वीचा शेवटचा पेपर संपल्यानंतर ती कॉलेजमधून घरी जात असताना आरोपीने तिला त्याच्या स्विफ्ट चारचाकी वाहनात बसवून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर आरोपीने वाहन आडवळणाच्या ठिकाणी उभे करून निर्भयेला धमकावत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये अशा अनेक घटना घडत असून केवळ समाजामध्ये बदनामी होईल या भीतीपोटी तक्रार देण्यासाठी अनेक निर्भया पुढे येत नाहीत. तसेच भाटनिमगाव प्रकरणातील आरोपीस अटक झाली नसेल तर तात्काळ अटक करावी. सदर आरोपी वरती कठोर कारवाई करावी. तसे न झाल्यास हिंदू संघटनेच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल.
__महेश बोधले. (हिंदुत्ववादी- कार्यकर्ते)
“घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला व तुझ्या कुटुंबियांना जिवंत ठेवणार नाही. तुम्ही गरीब आहात, माझे कोणी काही वाकडे करू शकणार नाही,” अशी धमकी आरोपीने दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.सदर घटना २८ मे २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भाटनिमगाव येथे घडल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मा. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे इंदापूर तालुक्यात संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.



