विशेष

बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीस वालचंद नगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

प्रभारी पोलिस अधिकारी राजकुमार डुणगे यांच्या टीमची पुन्हा एकदा दमदार कामगिरी.

इंदापूर,दि.२८

  • संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना काही महिन्यांपूर्वी पुण्यातील बोपदेव घाटात घडली होती. त्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीस अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर वालचंदनगर पोलिसांनी पाठलाग करून अकलूज येथून ताब्यात घेतले आहे. या कामगिरीमुळे वालचंदनगर पोलिस व प्रभारी पोलिस अधिकारी राजकुमार डुंणगे यांचे कौतुक केले जात आहे.

गेल्या वर्षी ऑक्टो- २४ मध्ये पुण्यातील बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेतील मुख्य व तिसरा आरोपी सुरज उर्फ बापू गोसावी याला अटक करण्यात वालचंदनगर पोलीस यशस्वी झाले आहेत. विशेष बाब म्हणजे वालचंदनगर पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज मधून सदर आरोपीला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत.

३ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री १०.४५ ते मध्यरात्री १.३० वाजण्याच्या दरम्यान बोपदेव घाटातील टेबल पॉइंट येथे ही बलात्कराची घटना घडली होती. आपल्या मित्रासवेत फिरायला गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. आरोपी सुरज उर्फ बापू गोसावी आणि त्याच्या इतर दोन साथीदारांनी मिळून तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केला होता.

सदर प्रकरणातील दोन आरोपींना या अगोदर पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्या आरोपींचे नाव चंद्रकुमार कनोजिया आणि शोएब अख्तर असे होते. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरज उर्फ बापू गोसावी फरार होता. त्यालाही अखेर पुणे ग्रामीणच्या वालचंदनगर पोलिसांनी अकलूज मधून ताब्यात घेतले.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार गुलाबराव पाटील, पोलीस हवालदार शैलेश स्वामी, पोलीस अमलदार विक्रम जाधव, पोलीस अमलदार गणेश वानकर, पोलीस अमलदार अभिजीत कळसकर, हवालदार चालक पोलीस हवालदार सचिन गायकवाड यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!