सामाजिक
नांदेड जिल्ह्यातील संदीपानी इंटरनॅशनल स्कूल मध्ये भारतीय कृषी विमा कंपनीतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
एक पेड मां के नाम अभियान.
नांदेड/प्रतिनिधी –
- दि.२२ रोजी केंद्र सरकारच्या (केंद्रीय कृषी मंत्रालय) यांच्या एक पेड मा के नाम अभियानांतर्गत भारतीय कृषी विमा कंपनीच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील संदीपानी इंटरनॅशनल स्कूल येथील हायस्कूल च्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संचालक मा. सुनील राठोड,मॅनेजिंग डायरेक्टर विपुल राठोड,मुख्याध्यापिका सबा बेग,समन्वयक निखिल आढे, शिक्षक वृंदा मध्ये नागेश हिंगोले,वैजनाथ जाधव,किसन जाधव,विद्यार्थी प्रतिनिधी मध्ये राजनंदिनी चव्हाण वर्ग १० वी विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच भारतीय कृषी विमा नांदेड जिल्हा प्रतिनिधी राहुल पालवे,तालुका प्रतिनिधी गणेश नरवडे, राधेश्याम थोरात,अनिल जोंधळी आदी.मान्यवर उपस्थित होते.