जिजाऊ फेडरेशनच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन.
इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन.
इंदापूर,दि.६
- इंदापूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना गेली दहा वर्ष तालुक्यामध्ये कोणताही मोठा उद्योग न आल्यामुळे नोकरीसाठी भटकंती आणि शोधाशोध करण्याची आलेली वेळ पाहता. सदर सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी इंदापूर तालुक्यामध्ये जिजाऊ फेडरेशनच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिजाऊ फेडरेशन च्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील तीन ठिकाणी या नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.दि.१२ ऑगस्ट रोजी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय भिगवण या ठिकाणी सकाळी १० ते १ या वेळेमध्ये आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि.१३ ऑगस्ट रोजी श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा या ठिकाणी सकाळी १० ते १ या वेळेमध्ये आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि.१४ ऑगस्ट रोजी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर या ठिकाणी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत या नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ फेडरेशनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या भव्य नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून तालुक्यातील ५००० हजार पेक्षा अधिक बेरोजगार तरुण,तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या नोकरी महोत्सवात राज्य व देश पातळीसह आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करणाऱ्या शेकडो कंपन्यांचे प्रतिनिधी पात्र उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून सक्षम, कुशल व रोजगारक्षम युवकांसाठी रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार आहे.
गरजू सुशिक्षित बेरोजगार युवकांनी ७५८८१५३४६४/९४२०४३५९६९/९८५०१२१७३३ या मोबाईल नंबर वरती मिस्ड कॉल देऊन आपली नोंदणी करावी तसेच जिजाऊ फेडरेशनच्या माध्यमातून नाव नोंदणीसाठी QR स्कॅनर स्कॅन केल्यास सदर व्यक्तीची नोंदणी केली जाणार आहे.
सदरच्या मेळाव्यासाठी राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे तसेच निरा-भिमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील हे स्वतः उपस्थित राहणार आहेत.