विशेष

BJP later/‘मोहसीन पठाणचा भाजपशी संबंध नाही’; पक्षाच्या नावाचा गैरवापर केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा.

इंदापूर,दि.२८

  • स्वतःला भाजप कार्यकर्ता म्हणणाऱ्या मोहसीन पठाण या व्यक्तीचा भारतीय जनता पक्षाशी कोणताही संबंध नसून, तो कधीही भाजपमध्ये नव्हता, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांनी स्पष्ट केले आहे. मोहसीन पठाण हा भाजपमध्ये असल्याचे सांगून तक्रारी अर्जाच्या माध्यमातून प्रशासनाची दिशाभूल करण्यात आला आहे.

याबाबत भारतीय जनता पक्षाच्या वतीने दि.६ जून २०२६ रोजी पत्र काढून मोहसीन पठाण याचा पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तसेच संबंधित व्यक्तीकडून भाजपच्या नावाचा गैरवापर होत असल्यास नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहनही करण्यात आले होते.

यानंतरही मोहसीन पठाण यांच्याकडून भारतीय जनता पक्षाच्या नावाचा गैरवापर सुरू असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!