मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूरात वृक्षारोपण; ‘झाडे लावा, झाडे वाचवा’चा संदेश.
भाजपचे युवा नेते प्रवीण माने यांच्या हस्ते वृक्षारोपण.

इंदापूर,दि २३
CM Devendra Fadnavis,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथे भाजपचे युवा नेते तथा पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
‘झाडे लावा, झाडे वाचवा’ हा संदेश देत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धन अत्यंत महत्त्वाचे असून, प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी बोलताना भाजपचे युवा नेते प्रवीण माने म्हणाले की, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे दूरदृष्टी असलेले, सक्षम आणि अभ्यासू नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळत आहे.
पायाभूत सुविधा, रस्ते आणि दळणवळणाच्या विकासावर भर देत राज्याच्या विकासाची गती वाढविण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. महाराष्ट्रातील सिंचन व जलसंधारण प्रकल्पांना गती देण्यासोबतच शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत.
औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना देत महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य राज्य बनविण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. प्रशासनात पारदर्शकता, गतिमानता आणि कार्यक्षमतेवर भर देणारे तसेच संकटाच्या काळात ठाम आणि धाडसी निर्णय घेणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
कायद्याचे राज्य आणि विकासाभिमुख प्रशासन यामुळे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये प्रभावी समन्वय साधत महाराष्ट्राच्या प्रगतीला गती देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नव्या महाराष्ट्राच्या निर्मितीचे शिल्पकार आहेत. विकासाची गती आणि जनतेचा विश्वास यांचा सशक्त संगम त्यांच्या नेतृत्वात पाहायला मिळत आहे.
तरुणाईला प्रेरणा देणारे आधुनिक नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अखंड कार्यरत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे हीच त्यांना खरी शुभेच्छा असल्याचे प्रवीण माने यांनी सांगितले.
‘झाडे लावा, झाडे वाचवा आणि पर्यावरण वाचवा’ या संदेशातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूरात सामाजिक बांधिलकीचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.



