मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; भाटनिमगावमध्ये ऑनलाइन तालुकास्तरीय चित्रकला व निबंध स्पर्धा.

इंदापूर,दि १०
- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालय, भाटनिमगाव यांच्या वतीने तालुकास्तरीय ऑनलाइन बाल चित्रकला व बाल निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकणार असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी दिली.
विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, वाचनसंस्कृती, विचारशक्ती आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
निबंध स्पर्धेचे विषय :-
लाडक्या बहिणीचा “देवा” भाऊ, स्वच्छ भारत – सुंदर भारत, माझा आवडता महापुरुष, झाडे लावा – झाडे जगवा, मोबाईल : वरदान की शाप?, वेळेचे महत्त्व, एक झाड शंभर उपकार, पुस्तकांचे महत्त्व, आई-वडील.
चित्रकला स्पर्धेचे विषय :-
नदी, दिव्यांचा उत्सव, मित्र-मैत्रिणींबरोबर मौजमजा, मी आणि माझा सेल्फी, संस्मरणीय रेल्वे प्रवास, माझे आवडते कार्टून कॅरेक्टर, स्वच्छ भारत, पाणी म्हणजे जीवन, चहा, कुटुंब आणि मंदिर.
या स्पर्धेतील उत्कृष्ट विद्यार्थ्यांना आकर्षक ट्रॉफी, प्रमाणपत्र तसेच रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेचे ओळखपत्र (आय-कार्ड) तसेच काढलेले चित्र किंवा निबंध २० जुलै ते २२ जुलै या कालावधीत ९८३४७५८६६३ या व्हॉट्सअँप क्रमांकावर पाठवावेत.
सर्व प्रवेशिकांचे तज्ज्ञ परीक्षकांकडून परीक्षण करून विजेत्यांची नावे जाहीर करण्यात येतील. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कल्पकतेचा आणि कलागुणांचा ठसा उमटवावा,” असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी केले आहे.



