विशेष

इंदापूरमध्ये गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त; कालठण नं-२ मधील एकास अटक.

इंदापूर, दि.१५

  • स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) पुणे ग्रामीण यांच्या पथकाने इंदापूर तालुक्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका युवकाला अटक करून त्याच्याकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना एलसीबी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

सदर कारवाईत रोहन उर्फ सोन्या महेंद्र ढवळण (वय २२, रा. कालठण नं -२ ता. इंदापूर, जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल, एक मॅगझीन आणि ७ जिवंत काडतुसे असा सुमारे २५,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी निकम, पोलीस हवालदार किशोर तेलंग, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, गणेश डेरे व तुषार चव्हाण यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!