बांधकाम चालू असलेल्या शाळेची भिंत कोसळून एक जण गंभीर जखमी; इंदापूर शहरा नजीक घटना सूत्रांची माहिती.

इंदापूर,दि १४
इंदापूर शहराजवळ सुरू असलेल्या एका मोठ्या शैक्षणिक संस्थेच्या बांधकामस्थळी अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम सुरू असलेल्या शाळेची भिंत अचानक कोसळल्याने एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.
या दुर्घटनेत जखमी व्यक्तीच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाल्याचे समजते. जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.
सदर शाळेचे बांधकाम एका प्रस्थापित राजकीय नेत्याशी संबंधित असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
घटनेची नेमकी कारणे काय आहेत, तसेच बांधकामस्थळी सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का, याबाबत चौकशीची मागणी होत आहे. ही माहिती अत्यंत गुप्तपणे ठेवण्यात आली असून कोणालाही काहीही कळू दिले नाही अशी सूत्रांची माहिती आहे. तसेच संबंधित घटनेची अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.



