इंदापूरात अत्याधुनिक गंगावणे हॉस्पिटलची सुरुवात; आरोग्य सेवेला नवी दिशा.
इंदापूरच्या आरोग्य क्षेत्रात गंगावणे हॉस्पिटलच्या माध्यमातून आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू.

इंदापूर,दि २३
- इंदापूर शहराच्या आरोग्य क्षेत्रात मोठी भर घालत गंगावणे हॉस्पिटल व नेत्र रुग्णालयाची सुरुवात झाली असून नागरिकांना अत्याधुनिक व सर्वसमावेशक उपचार सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत. डॉक्टर दीपक गंगावणे व डॉक्टर तृप्ती दीपक गंगावणे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या हॉस्पिटलचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, इंदापूर शहर झपाट्याने विस्तारत असून वाढत्या लोकसंख्येमुळे दर्जेदार आरोग्यसेवेची गरज निर्माण झाली आहे. अशा वेळी गंगावणे हॉस्पिटलसारखी सुविधा सुरू होणे ही शहरासाठी मोठी दिलासादायक बाब आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना चांगल्या दर्जाचे उपचार मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गंगावणे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून रुग्णांना २४ तास आपत्कालीन सेवा, ओपीडी सेवा, आयसीयू सुविधा, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, अनुभवी डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ, तसेच अचूक निदानासाठी आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध आहे. रुग्णांच्या सर्व तपासण्या व उपचार एकाच ठिकाणी होणार असल्याने वेळ व खर्च दोन्हीची बचत होणार आहे.
इंदापूर शहरात नव्याने सुरू झालेल्या गंगावणे हॉस्पिटलमधील नेत्र (डोळे) विभाग विशेष आकर्षण ठरत आहे. या विभागात डोळ्यांची संपूर्ण तपासणी, संगणकीकृत दृष्टी चाचणी, मोतीबिंदू (कॅटरॅक्ट) शस्त्रक्रिया, लेन्स बसविण्याची सुविधा, ग्लॉकोमा तपासणी व उपचार, रेटिना संबंधित आजारांचे निदान व उपचार, तसेच लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारांवर विशेष उपचार उपलब्ध करण्यात आले आहेत.आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने अचूक व सुरक्षित शस्त्रक्रिया येथे केल्या जाणार आहेत.
हे हॉस्पिटल जुना अकलूज रोड, बाबा चौक, इंदापूर येथे सुरू करण्यात आले असून अत्याधुनिक सुविधा, नवीन तंत्रज्ञान आणि रुग्णाभिमुख सेवा यामुळे इंदापूर शहराच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा मिळाली आहे. स्थानिक नागरिकांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार असून भविष्यातही अशाच गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा हॉस्पिटलचा मानस आहे.



