विशेष

नगराध्यक्ष भरतशेठ शहा यांच्या प्रयत्नांना यश; इंदापूरमध्ये शास्ती कर १००% माफ!

इंदापूर,दि २३

  • इंदापूर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय शासनाने जाहीर केला असून, मालमत्ता करावरील शास्ती (दंड) १०० टक्के माफ करण्यात आली आहे. या निर्णयामागे नगराध्यक्ष भरतशेठ शहा यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि ठाम भूमिका निर्णायक ठरली आहे.

इंदापूरमधील अनेक नागरिक मालमत्ता कराच्या थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत सापडले होते. याची दखल घेत नगराध्यक्ष भरतशेठ शहा यांनी शासन स्तरावर वारंवार पाठपुरावा करत, नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, शासनाने शास्ती पूर्णपणे माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार, १९ मे २०२५ पर्यंत थकीत असलेल्या मालमत्ता कराची रक्कम जर ३१ मार्च २०२६ पर्यंत भरली, तर संबंधित करावरील संपूर्ण शास्ती माफ केली जाणार आहे. मात्र, ही सवलत केवळ दंडापुरती मर्यादित असून मूळ कर रकमेवर कोणतीही सूट देण्यात आलेली नाही.

या योजनेमुळे इंदापूरमधील हजारो थकबाकीदार नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, नगरपरिषदेच्या थकीत कर वसुलीतही मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे संकेत दिले आहेत.

नगराध्यक्ष भरतशेठ शहा यांनी या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “इंदापूरच्या नागरिकांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास कायम ठेवण्याचा मी प्रयत्न केला. शास्तीकर माफ होण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांची फार मोठी मदत झाली आहे. इंदापूर शहरातील नागरिकांच्या अडचणी समजून घेत शासनापर्यंत आवाज पोहोचवला आणि आज त्याला यश मिळाले, याचा मला आनंद आहे. पुढेही जनतेच्या हितासाठी सातत्याने काम करत राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!