Uncategorized
माळवाडी गणातून पंचायत समितीची निवडणूक लढवणार – महादेव व्यवहारे.

इंदापूर,दि.२५
- राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणाऱ्या काहीच दिवसांमध्ये जाहीर होणार आहेत. त्यातच पुणे जिल्हा परिषदेची गट आणि गण रचना पूर्ण झाली असून इंदापूर तालुक्यातील माळवाडी गणातून कोणत्याही परिस्थितीत यंदा पंचायत समितीची निवडणूक लढविणारच असा निश्चय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचे खंदे समर्थक महादेव व्यवहारे यांनी व्यक्त केला आहे.
महादेव व्यवहारे हे माळवाडी गावचे रहिवासी असून मंत्री दत्तात्रय भरणे यांचे खंदे समर्थक आहेत. तसेच महादेव व्यवहारे यांच्याकडे ओबीसींचे युवा नेते म्हणून पाहिले जाते. माळवाडी गाणातील प्रत्येक गावात त्यांचा व त्यांच्या मित्र परिवाराचा दांडगा जनसंपर्क असून ते सतत सामाजिक कामात अग्रेसर असतात.
यावर्षी होणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये माळवाडी हा नवीन तयार झाला असून या गणात अनेकांची नावे इच्छुक म्हणून समोर येत आहे. मात्र, लोकांमध्ये व युवकांमध्ये थेट जनसंपर्क असलेले महादेव व्यवहारे यांचे नाव आघाडीवरती आहे. पक्ष नेतृत्वाचा महादेव व्यवहारे यांच्यावरती प्रचंड विश्वास असून नक्कीच महादेव व्यवहारे यांच्या नावाचा विचार पंचायत समितीच्या निवडणुकीत माळवाडी गणातून होऊ शकतो.



