भवानीनगर मध्ये दोन मुलांवरती जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना वालचंदनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे यांची दमदार कामगिरी.

इंदापूर,दि.१
- भवानीनगर येथील कॉलेज मधील प्रेम प्रकरणाच्या कारणावरुन दोन मुलांवरती धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना अवघ्या काही तासात वालचंदनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे व त्यांच्या टीमने दमदार कामगिरी केली आहे.
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर गावात भवानी माता मंदिराच्या परिसरात एक धक्कादायक घटना घडली होती.संचित घोळवे आणि सुजल जाधव या तरुणांवरती धारदार शस्त्राने जीव घेणा हल्ला करून जखमी केले होते. सदरची घटना घडल्यापासून अवघ्या दोन तासातच वालचंदनगर पोलिसांनी या घटनेतील आरोपींना ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत.
सदर प्रकरणातील आरोपींची नावे अदनान महंमद शेख,पियुष चव्हाण आणि यशराज अरवडे असे असून ते इंदापूर तालुक्यातील सणसर गावातील रहिवाशी आहेत.यांसोबत या गुन्ह्यात इतर दोन विधी संघर्ष ग्रस्त बालकांचा ही नावे समाविष्ट आहेत.
हल्ला करणारी मुले ही बारामती वरुन पुणेच्या दिशेने जात असल्याची तांत्रिक माहिती प्राप्त होताच वालचंदनगर पोलीस पथकाने एखाद्या हिंदी सिनेमातील सीन प्रमाणे सिनेस्टाईल पाठलाग करुन त्यांना सुपा पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस टीम व स्थानिक गावकरी यांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे.
भवानीनगर मध्ये आरोपींची काढली धिंड..!!
सदर आरोपींनी भवानीनगर मध्ये ज्या बाजारपेठेत दोन तरुणांवरती जीवघेणा भ्याड हल्ला केला. त्याच बाजारपेठेतून सदर आरोपींची वालचंदनगर पोलिसांनी धिंड काढत जर कोणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम केले त्याची खैर केली जाणार नाही असा सूचक इशारा दिला आहे.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस उप-निरीक्षक विजय टेळकीकर, पो. हवा गुलाबराव पाटील, बापु मोहिते, शैलेश स्वामी, गणेश काटकर, अजित थोरात, नानासाहेब आटोळे, सचिन गायकवाड, पो.कॉ अभिजीत कळसकर, विक्रमसिंह जाधव यांनी केली आहे.