क्राईम

PUNE LCB/गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई.

इंदापूर,दि २७

  • वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जवळ बाळगून दहशत माजविण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. ओंकार उर्फ नाना सोमनाथ देशमुख (रा. जंक्शन, ता. इंदापूर, जि. पुणे) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत ओंकार देशमुख हा नीलमणी मंगल कार्यालयाजवळ गावठी पिस्तूल जवळ बाळगून उभा असल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री करून पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला. त्यानंतर संशयिताला शिताफीने ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.

पोलिसांनी पिस्तूल व काडतूस असा एकूण ३० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार तुषार चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, सहायक पोलीस फौजदार शिवाजी निकम, पोलीस हवालदार किशोर तेलंग, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, पोलीस अमलदार गणेश डेरे आणि तुषार चव्हाण यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!