विशेष

नगराध्यक्ष भरत(शेठ)शहा यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद कर्मचाऱ्यांना आर्थिक न्याय.

१.५७ कोटी थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात.

इंदापूर,दि ८

  • इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने कामगारांच्या हितासाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून, नगराध्यक्ष भरत(शेठ)शहा यांच्या नेतृत्वाखाली एकूण ₹१,५७,५४,८४० इतकी रक्कम कामगारांना वितरित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक बाबींना न्याय मिळाला असून कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यामध्ये इंदापूर नगरपरिषदेतील नियमित करण्यात आलेल्या ४१ कर्मचाऱ्यांना वेतन फरकाची ₹८०,९३,८३३ इतकी रक्कम देण्यात आली. तसेच सेवानिवृत्त ८ कर्मचाऱ्यांना उपदान (Gratuity) व रजा रोखीकरणाच्या स्वरूपात ₹६४,०६,३५० देण्यात आले. याशिवाय सेवानिवृत्त २९ कर्मचाऱ्यांना (१०/२०/३० फरक) अंतर्गत ₹१२,४९,६५७ इतकी रक्कम वितरित करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ₹१.५७ कोटींचा निधी कामगारांच्या खात्यात जमा करण्यात आला.

या वितरण कार्यक्रमाला मुख्याधिकारी रमेश ढगे तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. कार्यक्रमावेळी कामगारांनी आपल्या भावना व्यक्त करत नगराध्यक्ष भरतशेठ शहा यांचे आभार मानले. अनेक कामगारांसाठी ही रक्कम मोठा दिलासा ठरली असून त्यांच्या आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.

विशेष म्हणजे, इंदापूर नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर “वन स्ट्रोक” पद्धतीने रक्कम वितरित करण्यात आल्याने प्रशासनाची कार्यक्षमता आणि कामगारांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली आहे. या निर्णयामुळे नगरपरिषदेबद्दल कामगारांमध्ये विश्वास अधिक दृढ झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!