विशेष

जबरी चोरी प्रकरणी दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त.

इंदापूर,दि २७

  • इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणच्या पथकाने दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

इंदापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १९८/२०२६ (BNS कलम ३०९(६) व इतर कलमे) अंतर्गत दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागातील पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.
या कारवाईत कृष्णा राजू गिरी (वय २०, रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि वैभव देविदास साळुंखे (वय 22, रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी विवो कंपनीचा वाय ९० मोबाईल, फास्टट्रॅक कंपनीचे मनगटी घड्याळ तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासासाठी आरोपी व जप्त मुद्देमाल इंदापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी (बारामती विभाग) मधुकर भट्टे आणि पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक कारंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी निकम, पोलीस हवालदार किशोर तेलंग, राजू मोमीन, स्वप्निल अहिवळे, अजय घुले, सुलतान डांगे, गुलाब पाटील, शैलेश स्वामी तसेच पोलीस अमलदार रहिस मुलाणी, गणेश डेरे आणि तुषार चव्हाण यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!