इंदापूरमध्ये “भरत (शेठ) शहा” यांना नगराध्यक्षपदासाठी जनतेचा वाढता पाठिंबा!
युवकांचा आदर्श, समाजकार्यात अग्रेसर, आणि विकासाचा निर्धार

इंदापूर,दि.१२
- इंदापूर शहरातील सर्वच घटकांमध्ये भरत (शेठ) शहा यांच्याविषयी एक विशेष आकर्षण आणि विश्वास वाढताना दिसत आहे. शहरातील युवक वर्ग, व्यापारी वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये “नगराध्यक्ष म्हणून भरत शेठ शहा” या नावाचा जयघोष सोशल मीडियावर जोरदारपणे उमटू लागला आहे. भरत शेठ यांचे फोटो, पोस्ट्स आणि व्हिडिओ विविध सोशल प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
भरत शेठ शहा हे गेल्या अनेक वर्षांपासून युवकांच्या पाठीशी उभे राहणारे, सामाजिक भान असलेले आणि नेहमी मदतीस तत्पर असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. कोणाचेही वैयक्तिक दुःख असो किंवा शहराचा प्रश्न, शहा कुटुंब नेहमी पुढे येते. इंदापूरच्या प्रत्येक गल्लीत, प्रत्येक परिसरात त्यांच्या मदतीच्या आणि माणुसकीच्या अनेक आठवणी आजही जिवंत आहेत.
पूर्वीच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या काळात इंदापूर शहराच्या विकासाचा वेग वाढला आणि शहराला राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्या यशामागे शहा कुटुंबाचा एकत्रित प्रयत्न आणि शहराच्या प्रगतीसाठीचा दूरदृष्टीकोन दिसून आला.जात, धर्म आणि पक्षीय भेद विसरून शहा कुटुंबाने सदैव सर्वांना बरोबर घेतलं आहे. त्यामुळेच आज नागरिकांना वाटतं.
आगामी इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भरत शेठ शहा यांनी उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी आता जनतेतून मोठ्या प्रमाणात होत असून शहरातील वातावरण उत्साहपूर्ण बनले आहे.



