विशेष
इंदापूर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी बापू मोरे यांची बिनविरोध निवड.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करणार-तालुकाध्यक्ष बापू मोरे.

इंदापूर,दि.१८
- पुणे व सातारा श्रमिक संघ संलग्न इंदापूर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी बाभुळगाव येथील बापू मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायत संघटनेची बैठक नुकतीच इंदापूर येथे पार पडली त्या बैठकीत नूतन तालुकाध्यक्ष म्हणून बापू मोरे यांचे नाव जाहीर करण्यात आले.
बापू मोरे यांच्या सामाजिक कार्याची व संघर्षाची तळमळ पाहता त्यांच्याकडून भविष्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसंदर्भात समस्या सोडविणे व संघटनेचे ध्येय धोरण तथा संघटना मजबूत ठेवण्यासाठी व संघटनेतील समन्वय साधण्याची जबाबदारी तालुकाध्यक्ष या नात्याने सोपविण्यात आली आहे.
या निवडीनंतर तालुका अध्यक्ष बापू मोरे म्हणाले की सर्व कर्मचारी आपली जबाबदारीने काम करत असतो. त्यांच्यावर गावची स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, आरोग्य, करवसुली, इनामे इतबारीने पार पाडत असतो. त्यांचे काही अडचणी असतील त्या दूर करण्याची हमी मी देतो. यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याला अडचण निर्माण झाल्यास आम्ही सर्वजण त्याच्या पाठीमागे ताकतीने उभे राहून येणारी अडचण सोडवू.