राजकीय
सौ.राधिका शेळके यांची इंदापूर तालुका महिला काँग्रेसच्या प्रभारी पदी नियुक्ती.
इंदापूर,दि.२५
- इंदापूर तालुका महिला काँग्रेसच्या प्रभारीपदी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या राधिका निवास शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राधिका शेळके यांच्या नियुक्तीची माहिती जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्ष किरणताई काळभोर यांनी पत्राद्वारे दिली आहे.
राधिका शेळके या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व माजी कार्याध्यक्ष निवास शेळके पत्नी आहेत. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी इंदापूर तालुक्यात काम केले असून सामाजिक क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय काम आहे. राधिका शेळके यांच्या निवडीने महिला काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या निवडीनंतर राधिका शेळके म्हणाल्या की इंदापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी अधिक ताकतीने यापुढे काम करून पक्ष व महाविकास आघाडी जो उमेदवार देतील त्या उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम करून विजय संपादित केला जाईल. यापुढे इंदापूर तालुक्यात महाविकास आघाडीचा व काँग्रेस पक्षाची विचारसरणी असलेला आमदार आपणाला झालेला दिसेल.