राजकीय

लाडकी बहीण कायम ठेवायची असेल तर युतीला निवडून द्या’:- उपमुख्यमंत्री अजित पवार.

४६०० कोटींच्या चेक वर सही करून इथे आलो.

पुणे,दि.२०

  • आम्ही लाडकी बहीण योजना जाहीर केली तेंव्हा विरोधकांनी त्याची खिल्ली उडविली. आताही विरोधक त्यात अडचणी आणण्याचे आटोकाट प्रयत्न करीत आहे. यामुळे लाडक्या बहिणींनी घाबरून जायचे काम नाही.

मात्र, योजना पुढेही सुरूच ठेवायची असेल तर, येणाऱ्या निवडणुकीत महायुतीला निवडून द्या, असे स्पष्ट आवाहन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी येथे केले.

बुलढाणा येथे १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी लाडकी बहिण सन्मान सोहळा पार पडला. बुलढाणा चिखली राज्य महामार्गावरील शारदा ज्ञानपीठच्या प्रांगणावर आयोजित या कार्यक्रमाला हजारो लाडक्या बहिणींची तोबा गर्दी उसळली होती.

यावेळी बोलताना अजितदादांनी मित्र पक्षातील ‘त्या’ नेत्यांना दोन खडे बोल सुनावत अक्षरशः कान टोचले. महायुतीतील वाचाळविरांना आवरण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र हा शिव शाहू फुले आंबेडकरांचा आहे, यशवंतराव चव्हाण सारख्या सुसंस्कृत नेत्यांचे राज्य आहे. याचे भान ठेवून नेत्यांनी भान ठेवून बोलावे, आपल्या (वक्तव्या) मुळे महायुती आणि सरकार अडचणीत येणार नाही याची काळजी घ्यावी, असा वडीलकीचा सल्ला त्यांनी दिला.

कुणी काहीही बोलले तर त्याला युतीचे समर्थन आहे असा परखड सल्ला देत त्यांनी कार्यक्रमाचा नूरच बदलून टाकला. आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा शहरात उभारलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांचे भरभरून कौतुक केले. इतके पुतळे महाराष्ट्र राज्यात कुठेच नसतील असे सांगून या पुतळे आणि स्मारक मुळे बुलढाण्याच्या वैभवात भर पडल्याचे त्यांनी सांगितले. या पुतळ्यांचं काळजीपूर्वक जतन करा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

४६०० कोटींच्या चेक वर सही करून इथे आलो

विरोधक लाडकी बहीण योजना निवडणूक नंतर बंद पडणार, असा अपप्रचार करून योजनेत अडसर आणण्याचा प्रयत्न करीत आहे.मात्र लाडक्या बहिणींनो तुम्ही अजिबात काळजी करू नका, योजना कुठल्याही स्थितीत बंद होणार नाही, असा दिलासा अजित पवारांनी दिला. या कार्यक्रमाला येण्यापूर्वीच पुढील हप्तासाठीच्या ४६०० कोटी रुपयांच्या धनादेश वर सही करूनच ईथे आल्याची माहिती त्यांनी दिली.

मात्र ही योजना सुरू ठेवायची असेल पुढील निवडणुकीत कमळ घड्याळ आणि धनुष्य बाण ला निवडून आना असे ‘रोख’ठोक आवाहन त्यांनी लाडक्या बहिणींना उद्धेशून केले. केवळ बहिणीच लाडक्या आहे असे नसून भाऊ देखील लाडके आहे, आम्हाला सर्व जनताच लाडकी असल्याचे त्यांनी स्मित हास्य करीत सांगितले, तेंव्हा कार्यक्रम स्थळी टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!