इंदापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट.
आ.दत्तात्रय भरणे यांचे नाव राज्यपाल नियुक्त यादीत अजित पवार गटाकडून पाठवल्याची सूत्रांची माहिती.
इंदापूर,दि.५
- इंदापूरच्या राजकारणामध्ये सतत वेगवेगळ्या घटना घडत असून राज्यपाल नियुक्त १२ आमदार हा इंदापूर मध्ये चर्चेचा विषय बनला आहे. त्यातच इंदापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला अजून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव राज्यपाल नियुक्त उमेदवारांच्या यादीत अजित पवार गटाकडून पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इंदापूरचे राजकारण प्रत्येक तासाला बदलू लागले आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव राज्यपाल नियुक्त १२ उमेदवारांच्या यादीत असल्याची माहिती मिळत असताना. आज अचानक विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना अजित पवार गटाकडून विधान परिषदेमध्ये पाठवून हर्षवर्धन पाटील यांचा मार्ग मोकळा करण्याची तयारी अजित पवार गटाने केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दररोज इंदापूरच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच महायुतीमध्ये इंदापूर विधानसभेच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. अजित पवार यांनी इंदापूर मध्ये येऊन दत्तात्रय भरणे यांना अपष्टपणे विधानसभेची उमेदवारी दिल्याचे जाहीर केले असले तरी भविष्यात इंदापूर व बारामती लोकसभेचे राजकारण पाहता पुन्हा अजित पवार यांनी भरणे यांना विधानसभेऐवजी थेट राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्ये विधान परिषदेवर पाठवण्याची तयारी पूर्ण केली असल्याची माहिती मिळत आहे.
आ. दत्तात्रय भरणे यांच्या नावासहित इतर सर्व १२ उमेदवारांच्या नावाची यादी राज्यपालांकडे आज माहिती सरकारने पाठवली असून लवकरच यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.