कृषी

INDAPUR karmayogi/कर्मयोगी चा प्रति टन ३८०० उच्चांकी दर जाहीर;पहिली उचल ३,६०० रुपये, तर अतिरिक्त २०० रुपये देण्याची घोषणा.

इंदापूर,दि २६

  • कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना, सहयोगी ओंकार शुगर युनिट-११ यांनी यंदाच्या ऊस गळीत हंगामासाठी प्रतिटन ३,८०० रुपये असा उच्चांकी ऊसदर जाहीर केला आहे. यामध्ये पहिली उचल म्हणून प्रतिटन ३,६०० रुपये, तर अतिरिक्त २०० रुपये असे एकूण ३,८०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ओंकार शुगरचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव बोत्रे यांनी यापूर्वी कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याच्या शेतकरी आणि सभासदांना यंदा उच्चांकी ऊसदर देण्याचा शब्द दिला होता. जाहीर केलेल्या दरातून त्यांनी आपला शब्द पूर्ण केल्याचे चित्र आहे.

कारखान्याचे अध्यक्ष, राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनीही यंदाच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना चांगला आणि उच्चांकी ऊसदर दिला जाईल, अशी ग्वाही दिली होती. आता प्रतिटन ३,८०० रुपयांचा दर जाहीर झाल्याने त्यांच्या आश्वासनाची पूर्तता झाली आहे.

कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व ओंकार शुगरचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव बोत्रे हे सातत्याने शेतकरी हिताला प्राधान्य देत ऊस उत्पादकांच्या दृष्टीने निर्णय घेत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे. कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना आणि सहयोगी ओंकार शुगर युनिट-११ यांनी जाहीर केलेल्या या दरामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

यंदाच्या हंगामात कारखाना प्रभावीपणे ऊस गाळप करेल आणि शेतकऱ्यांच्या उसाला चांगला मोबदला मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. जाहीर झालेल्या उच्चांकी दरामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आनंदाचे वातावरण असून शेतकरी वर्गातून बाबुराव बोत्रे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!