क्राईमविशेष

Indapur off /उद्या इंदापूर बंद.

विश्रांतवाडी येथील चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा.

इंदापूर,दि ३०

  • पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ उद्या इंदापूर शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चिमुकलीला न्याय मिळावा आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेतला जावा, यासाठी इंदापूरकरांनी एकजुटीने बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

इंदापूर शहरातील नागरिकांच्या सहभागातून मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे.अत्याचारग्रस्त चिमुकलीला न्याय मिळावा आणि अशा घटनांना आळा बसावा, या मागणीसाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे येथील विश्रांतवाडी परिसरात राहणाऱ्या महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीला २२ सप्टेंबर रोजी वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. त्यानंतर मुलीशी संवाद साधल्यानंतर एका ५२ वर्षीय व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती समोर आली.

मुलगी मैत्रिणीसोबत खेळत असताना मैत्रिणीच्या आईने तिला एका नातेवाइकाच्या घरी पीठ आणण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी घरात एकटी असल्याचा फायदा घेत संबंधित व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपीला अटक केली आहे.

‘आपल्या लेकीच्या सुरक्षित भविष्यासाठी इंदापूर शहर एक दिवस बंद ठेवूया’, असा संदेश देत नागरिकांनी बंद आणि मूक मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!