विशेष

इंदापूर तालुक्यात कृषी विभागाची कडक कारवाई; २ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित.

पॉस प्रणाली व साठ्यात तफावत उघड.

इंदापूर,दि २५

  • इंदापूर तालुक्यातील खत विक्री व्यवस्थेतील अनियमितता उघडकीस आल्यानंतर कृषी विभागाने मोठी कारवाई करत महेश फर्टिलायझर (आगोती नं. १) आणि गणेश ॲग्रो एजन्सी (कळस) या दोन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत.

तपासणीदरम्यान असे स्पष्ट झाले की, संबंधित केंद्रांकडून पॉस मशीनद्वारे युरिया विक्री दाखवली जात असली तरी प्रत्यक्ष साठा अद्ययावत ठेवण्यात आलेला नव्हता. त्यामुळे साठ्याच्या नोंदीत आणि प्रत्यक्ष उपलब्धतेत मोठी तफावत दिसून आली. याशिवाय, काही व्यवहारांमध्ये एकाच शेतकऱ्याच्या नावावर २० ते ५० पोती युरिया खताची अतिरिक्त विक्री दाखवण्यात आली होती.

या गंभीर प्रकारांची दखल घेत कृषी विभागाने महेश फर्टिलायझर (आगोती नं. १)गणेश ॲग्रो  एजन्सी (कळस) या दोन्ही केंद्रांवर दंडात्मक कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित केले आहेत. निलंबन कालावधीत संबंधित विक्रेत्यांना सर्व प्रकारच्या खत विक्रीस बंदी घालण्यात आली आहे.

इंदापूर तालुक्यात युरिया खत पुरवठ्यावर परिणाम होऊ नये यासाठी कृषी विभागाने १ एप्रिलपासून विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत पॉस प्रणालीवरील साठा आणि प्रत्यक्ष साठा यांची पडताळणी करण्यात येत असून, सुमारे ३,००० मेट्रिक टन युरिया खताचा साठा अद्ययावत करण्यात आला आहे.

यामुळे आगामी खरीप हंगामात खताची अचूक उपलब्धता सुनिश्चित करण्यास मदत होणार आहे. तसेच, विक्रेत्यांनी शेतकऱ्यांच्या क्षेत्रानुसारच खत विक्री करावी, अतिरिक्त विक्री व साठेबाजी टाळावी, आणि सर्व व्यवहार पॉस मशीनद्वारेच करावेत, असे स्पष्ट निर्देश कृषी विभागाने

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!