माळवाडी नंबर-२ मध्ये अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाईची चाहूल?

इंदापूर,दि १८
- माळवाडी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत माळवाडी नंबर-२ येथे अनधिकृत अतिक्रमणावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्य रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभारलेल्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
वरिष्ठ पातळीवरून अतिक्रमण हटवण्याचे आदेश लवकरच येण्याची शक्यता असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांनीही रस्ता मोकळा करण्यासाठी कारवाईची मागणी केली होती.
माळवाडी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत माळवाडी नंबर २ येथील मुख्य रस्त्यावर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणावर लवकरच मोठ्या प्रमाणावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारी, वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याची माहिती समोर येत आहे.
माळवाडी नंबर-२ मधील मुख्य मार्गावर बेकायदेशीरपणे दुकाने, शेड, बांधकामे तसेच इतर अडथळे उभारल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, आपत्कालीन सेवांनाही अडचणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
या कारवाईमुळे रस्ता मोकळा होऊन वाहतूक सुरळीत होईल, असा नागरिकांना दिलासा आहे. मात्र, अतिक्रमणधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर प्रकरणात वरिष्ठ प्रशासनाकडून लवकरच ठोस आदेश येण्याची शक्यता असून, एकत्रित मोहीम राबवून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटवले जाऊ शकते.



