राजकीयविशेष
Trending

हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येची दमदार राजकीय झेप;अंकिता पाटील-ठाकरे यांची महिला व बालकल्याण सभापतीपदी निवड.

इंदापूर,दि २

  • इंदापूर तालुक्यातील बावडा-लुमेवाडी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील-ठाकरे यांची पुणे जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे इंदापूर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अंकिता पाटील-ठाकरे या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या असून त्यांनी आपल्या कार्यशैली आणि जनसंपर्काच्या जोरावर राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी इंदापूर तालुक्यात सर्वाधिक मतांनी विजय मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली.

विशेष म्हणजे त्या सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत निवडून आल्या आहेत.यंदाच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यांच्या या विजयानंतर पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवत महिला व बालकल्याण सभापतीपदाची धुरा दिली आहे.

अंकिता पाटील-ठाकरे यांच्या निवडीने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून विविध ठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. त्यांच्या माध्यमातून महिला व बालकल्याण क्षेत्रात अधिक प्रभावी काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषद सभापती पदांची घोषणा पुढीलप्रमाणे:

  • विक्रम खुटवड : बांधकाम व आरोग्य सभापती
  • जितेंद्र बडेकर : समाज कल्याण सभापती
  • अंकिता पाटील : महिला व बालकल्याण सभापती
  • दिपाली हुलवळे : कृषी सभापती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!