विशेष

उजनी जलाशयात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला; इंदापूर पोलिसांकडून ओळख पटवण्याचे आवाहन.

इंदापूर,दि १०

  • इंदापूर पोलिस स्टेशन अकस्मात मृत्यू रजिस्टर नं. ०३/२०२६ बीएनएसएस १९४ प्रमाणे, उजनी जलाशयाच्या पाण्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. सदर मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षांच्या दरम्यान असून त्याचे नाव व पत्ता अद्याप समजू शकलेला नाही.

दि ०७/०१/२०२६ रोजी सकाळी ०९.०० वाजण्याच्या सुमारास, मौजे काळेवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) गावाच्या हद्दीत उजनी जलाशयाच्या पाण्यात मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच इंदापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्तीच्या अंगावर पांढऱ्या रंगाची फुल बाह्यांची शर्ट, त्यावर OLYMPIA असा शिक्का असलेला असून, काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेली आहे.

मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील तपास इंदापूर पोलिसांकडून सुरू आहे.
सदर मृत व्यक्तीबाबत कोणासही नातेवाईक, ओळख किंवा अन्य माहिती असल्यास त्यांनी तात्काळ इंदापूर पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. इंदापूर पोलिस स्टेशन (पुणे ग्रामीण) फोन ०२१११/२३३३३३,पो.हवालदार भोईटे, मोबाईल :-९७६५१०१०१३

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!