इंदापूर तालुका ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा!

इंदापूर,दि.१४
- महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ, इंदापूर तालुका शाखेच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. हे आंदोलन मंगळवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती, इंदापूर येथे करण्यात आले.
संघटनेचे अध्यक्ष बापू मोरे व इतर जिल्ह्याचे पदाधिकारी यांनी सांगितले की, शासनाने अनेक वेळा आश्वासने दिली असली तरी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या अजूनही मार्गी लागलेल्या नाहीत. त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे —
1️⃣ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन त्वरित देण्यात यावे.
2️⃣ कोरोना काळातील २३ महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता त्वरित मिळावा.
3️⃣ कर्मचाऱ्यांचा राहणीमान भत्ता व प्रवास भत्ता लवकरात लवकर देण्यात यावा.
4️⃣ राष्ट्रीय सण दिवाळी निमित्त सर्व कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात यावा.
5️⃣ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम बँक खात्यात नियमित जमा करण्यात यावी.
संघटनेने इशारा दिला आहे की, जर शासन व प्रशासनाने या मागण्या त्वरित मान्य केल्या नाहीत, तर पुढील काळात हे आंदोलन तीव्र करण्यात येईल.
या वेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ (शाखा इंदापूर) बापू विठ्ठल मोरे – अध्यक्ष, निलीन म. कांबळे – उपाध्यक्ष, हनुमंत प. शिंदे – सचिव, तुकाराम न. गाडे – कार्याध्यक्ष, हनुमंत वाय. भुये – उपसचिव, निलीन म. गाडे – संपर्कप्रमुख, विठ्ठल रा. दगडे – सल्लागार, तुकाराम न. गाडे – जिल्हा उपाध्यक्ष, हनुमंत वाय. भुये – सदस्य, निलीन म. गाडे – कोषाध्यक्ष, सतीश म. शिंदे – सदस्य,दशरथ कडवळे(शहा) यांच्या सह आदी कर्मचारी उपस्थित होते.



