विशेष

“दारुड्या निघाला अट्टल चोर”;इंदापूर पोलिसांची धडक कारवाई.

इंदापूर,दि.४

  • इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे घडलेली एक घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की कायद्याचा हात लांब असतो आणि गुन्हेगार कितीही चपळ असला तरी पोलिसांच्या जाळ्यातून सुटत नाही.दारूच्या नशेत वेडावाकडा ट्रॅक्टर चालवणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी जेरबंद केले. सुरुवातीला त्याने आपली खरी ओळख लपवून वेगवेगळी नावे सांगण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या चाणाक्ष तपासामुळे अखेर त्याचा चोरी व फसवणुकीचा काळा इतिहास उघड झाला.

चोराच्या बेफिकीर ‘ड्रायव्हिंग’मुळे उघडकीस आलेले गुन्हे..!!

२ ऑक्टोबर रोजी रात्री सरडेवाडी शिवारात ट्रॅक्टर बेकायदेशीर पद्धतीने चालवला जात असल्याची माहिती मिळताच सपोनि सीमा पाटील व त्यांच्या पथकाने वेळीच कारवाई केली. थांबवलेला इसम वारंवार खोटी नावे सांगत होता. परंतु पोलिसी नजर चुकवणे एवढे सोपे नाही. चौकशीत समोर आले की तो ट्रॅक्टर हा प्रत्यक्षात चोरीचा असून सदर आरोपीचे नाव दत्तात्रय सदाशिव जाधव,वय-३४ रा.पेनूर,ता-पंढरपुर,जि-सोलापुर आहे.

पोलिसांच्या तत्परतेमुळे गुन्हेगारीला आळा..!!

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या नेतृत्वाखाली सहा,पो.निरिक्षक स्मिता पाटील,पोलीस हवालदार दुरगुडे, नंदु जाधव, विशाल गोडगे, विठ्ठल गिरी, प्रसाद मोरे यांच्या पथकातील अधिकारी-अमलदारांनी दाखवलेली तत्परता व धाडस खरंच कौतुकास्पद आहे.

इंदापूर पोलिसांनी दाखवलेली ही धडक कारवाई समाजासाठी दिलासा देणारी आहे. कारण दारुच्या नशेत कायदा हातात घेणाऱ्यांपासून ते चोरी व फसवणुकीत माहिर गुन्हेगारांपर्यंत – कोणीही कायद्यापासून मोठा नाही. अशा कारवायांमुळे गावोगावी गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यास मदत होते, तसेच सामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक बळकट होतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!