विशेष

इंदापूर पोलिसांकडून अवैध हातभट्टीवर कारवाई.

इंदापूर,दि.२६

  • इंदापूर तालुक्यातील निरा नरसिंहपूर,येथे नाना अनंता सरवदे हा व्यक्ती अवैधरित्या हातभट्टी चालवून दारू तयार करून विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने इंदापूर पोलिसांनी सापळा रचून दिनांक 24/09/2025 रोजी छापा टाकला. छाप्यामध्ये आरोपी नाना सरवदे हा हातभट्टीची दारू बनविताना व विक्री करीत असताना रंगेहात मिळून आला.

सदर दारूमध्ये नाशवंत रसायनांचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

याबाबत इंदापूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 720/2025 हा गुन्हा BNS 2023 SEC. 123 सह दारूबंदी अधिनियम कलम 65(ई) प्रमाणे नोंदविण्यात आला आहे.

आरोपी नाना अनंता सरवदे, रा. निरा-नृसिंहपुर, ता. इंदापूर यास अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी आरोपीस दि. 26/09/2025 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!