विशेष
इंदापूर गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकपदी योगेश फडतरे यांची नेमणूक.

इंदापूर,दि.९
- इंदापूर तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पदी योगेश फडतरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खते, बियाण्यांचे प्रमाणीकरण, परवाने वितरण आणि बनावट आणि बोगस निविष्ठांवरील कारवाईचे अधिकार असलेल्या कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाची पुनर्रचना राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार इंदापूर तालुक्यासाठी योगेश फडतरे यांची पूर्णवेळ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या अर्धवेळ निरिक्षकांऐवजी पूर्णवेळ निरीक्षक शासनाकडून नेमले गेले आहेत.
मुळात जबाबदारी निश्चित करुन कामात एकसूत्रीपणा आणण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.हे पद पुर्ण वेळ निरीक्षक असल्याने कृषि निविष्ठाच्या गुणवत्तेसाठी नियमित लक्षाकाप्रमाणे नमुने काढण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या कृषि निविष्ठा मिळण्यास मदत होइल.
इंदापूर तालुक्यातील बियाणे, खत व औषधविक्री दुकानदारांनी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या निविष्ठा उपलब्ध करुन द्याव्यात. ज्यादा दराने विक्री करू नये, साठेबाजी करू नये.
योगेश फडतरे (तालुका गुणनियंत्रण निरीक्षक)
बोगस कृषि निविष्ठा, ज्यादा दराने विक्री, साठेबाजी आढळून आल्यास खत, बियाणे, कीटकनाशके कायद्यानुसार कठोर कारवाई करणार असल्याचे फडतरे यांनी सांगितले.



