राजकीयविशेष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या इंदापूर मध्ये..? मोठ्या राजकीय घडामोडींची होण्याची शक्यता…?

 

इंदापूर,दि.२८

  • महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या इंदापूर तालुक्यातील नृसिंहपुर येथे देवदर्शनासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली असून या दौऱ्यात इंदापूर तालुक्यात मोठ्या राजकीय घडामोडी होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

विशेष म्हणजे देवेंद्र फडणीस हे इंदापूर दौऱ्यात कोणती राजकीय खेळी खेळणार याकडे लक्ष लागले असले तरी ते प्रामुख्याने नृसिंहाच्या दर्शनासाठी इंदापूर तालुक्यातील नृसिंहपुर येथे येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय दृष्ट्या शांत असलेल्या इंदापूर तालुक्यात अचानक मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची अनेक नेते भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र कोणते नेते भेट घेणार हे समजू शकले नसले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इंदापूर तालुक्यात काय जादू करणार याकडे लक्ष लागून राहिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!