इंदापूर,दि.३
- आज राज्याचे माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटी वेळी स्वतः अंकिता पाटील ठाकरे उपस्थित होत्या.
हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली असून ७ तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत इंदापूर मध्ये पक्ष प्रवेशाचे संकेत मिळत आहेत.
हर्षवर्धन पाटील यांच्या शरद पवार गटातील प्रवेशामुळे महाराष्ट्रात भाजपला मोठे खिंडार पडले असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपला गळती लागली आहे. तर येणाऱ्या इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे अशी सरळ लढत निश्चित मानली जात आहे.