आरोग्य

पोलीस रेझिंग डे निमित्त छायाताई पडसळकर यांचे रक्तदान; महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण”

इंदापूर,दि.१०

  • २ जानेवारी पोलीस रेझिंग डे व ६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून इंदापूर पोलीस स्टेशनच्या वतीने गुरुवार दि. ०८ जानेवारी २०२६ रोजी इंदापूर पोलीस स्टेशन परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे रक्तदान शिबिर अत्यंत उत्साहात व नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले.

या उपक्रमामागे सामाजिक बांधिलकी जपत रक्ताची तातडीची गरज असलेल्या रुग्णांना मदतीचा हात देण्याचा उद्देश होता. “रक्तदान हे श्रेष्ठदान असून एक थेंब रक्त अनेकांचे प्राण वाचवू शकतो” हा संदेश या शिबिरातून देण्यात आला.

या रक्तदान शिबिराची विशेष बाब म्हणजे सहभागी प्रत्येक रक्तदात्याला सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेट भेट स्वरूपात देण्यात आले. या उपक्रमास नागरिक, युवक, पत्रकार बांधव तसेच विविध क्षेत्रातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे राजकीय क्षेत्रातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट) पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा छायाताई पडसळकर यांनी स्वतः रक्तदान करत समाजास प्रेरणादायी संदेश दिला.

इंदापूर पोलीस स्टेशनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पोलीस व जनता यांच्यातील नाते अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!