विशेष

भाटनिमगाव येथे नवीन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन; ग्रामस्थांना केंद्र शासनाच्या योजनांचा थेट लाभ.

इंदापूर,दि २७

  • भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथे दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायतीअंतर्गत नवीन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. इंदापूर शहरापासून दूर असलेल्या या गावात बँकिंगसह मूलभूत आर्थिक सुविधा मिळवण्यासाठी ग्रामस्थांना पाच ते सात किलोमीटर अंतर प्रवास करावा लागत होता. मात्र आता पोस्ट ऑफिस सुरू झाल्याने केंद्र शासनाच्या विविध योजना व सुविधा ग्रामस्थांना थेट गावातच उपलब्ध होणार आहेत.

हे पोस्ट ऑफिस सुरू होण्यासाठी बारामती विभागाचे सुदाम साबळे यांनी विशेष प्रयत्न करून मंजुरी मिळवली. तसेच विजय कदम यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करत भाटनिमगावकरांचे “मुक्काम आणि पोस्ट दोन्ही भाटनिमगाव” हे स्वप्न साकार केले. उद्घाटन समारंभात ते कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी ग्रामस्थांना पोस्ट ऑफिसच्या विविध योजना, बचत खाते, टाईम डिपॉझिट आदींबाबत सविस्तर माहिती देत विश्वास निर्माण केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच मनोहर भोसले यांनी केले.

भाटनिमगाव चे विद्यमान सरपंच अजित (बापू) खबाले यांनी गावकऱ्यांना पोस्ट ऑफिसमधील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करत, स्वतः ५० हजार रुपयांचे टाईम डिपॉझिट खाते पहिल्याच दिवशी उघडून ग्रामस्थांना प्रेरणा दिली.

यावेळी ग्रामसेवक निलेश यादव यांनी मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली. तसेच माजी सरपंच पंजाबराव गायकवाड, विविध संस्थांचे पदाधिकारी, बावडा उपडाकघर अंतर्गत पंचक्रोशीतील सर्व पोस्ट ऑफिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नवीन पोस्ट ऑफिसच्या उद्घाटनामुळे भाटनिमगावच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!