इंदापूरच्या जनआधाराचा नवा चेहरा; प्रभाग क्र-३ चे जनतेचे उमेदवार “गणेश नंदू राऊत’.

इंदापूर,दि.१
- इंदापूर शहरात सामाजिक कार्य, लोकसहभाग आणि सर्वसामान्यांसाठीच्या निष्ठेने सतत कार्यरत राहून जनतेच्या मनात अनोखी ओळख निर्माण करणारे नाव म्हणजे गणेश नंदू राऊत. परंपरा, समाजसेवा आणि लोककल्याण यांचा परिपूर्ण संगम त्यांच्या कार्यातून दिसून येतो. जय भवानी मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी तरुणाईला योग्य दिशा देत सामाजिक सेवेला अग्रक्रम दिला. आज प्रभाग क्रमांक ३ मधून जनतेच्या अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेत ते नव्या जोमाने विकासासाठी सज्ज झाले आहेत.
धर्म आणि संस्कृती जपत राऊत यांनी इंदापूर तालुका व पुणे जिल्ह्यातील कोणीही न केलेला ऐतिहासिक उपक्रम राबवला. तब्बल दीड महिना चाललेली बारा ज्योतिर्लिंग आणि चारधाम कावड यात्रा ही केवळ धार्मिक भावनेची प्रचिती नसून भक्ती, श्रद्धा आणि सेवा यांचे आदर्श उदाहरण ठरली.या यात्रेवर त्यांनी स्वखर्चातून तब्बल ४० लाख रुपये खर्च करत समाजासाठी भाविकता, सेवाभाव आणि निष्ठेची नवी परंपरा निर्माण केली.
सामाजिक सहभाग ही त्यांची जीवनशैली. नवरात्र उत्सवात सलग दोन वर्ष स्वखर्चातून दांडिया स्पर्धेचे आयोजन करून कोणाकडूनही निधी न मागता संस्कृतीचा अविष्कार घडवून आणला. या उपक्रमातून त्यांनी पारंपरिक सणांना आधुनिकता आणि शिस्तीची जोड देत सर्वांचा सहभाग कायम ठेवला.
अडचणीत सर्वसामान्यांसाठी कायम उपलब्ध, नागरिक संकटात असताना धावून जाणे हे त्यांचे ब्रीद,गरजू रुग्णांसाठी आर्थिक मदत आणि उपचारांची सोय,गरीब कुटुंबाला त्वरित सहाय्य,या त्यांच्या मदतीमुळे अनेक कुटुंबांवरची संकटे दूर झाली.
ते केवळ सहाय्य करत नाहीत, तर माणसाला माणूस म्हणून जगवतात.
पर्यावरणाबद्दल जागरूकता दाखवत त्यांनी प्रभागांमध्ये वृक्षारोपण मोहिम राबवली. स्मशानभूमीत आणि सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी बाकांची सोय, तसेच अंबिका नगरमधील तुळजाभवानी मंदिर परिसराची स्वच्छता आणि स्वच्छता राखण्यासाठी सतत जागरूकता हे त्यांचे समुदायकेंद्रित काम लोकांच्या मनात दृढ झाले आहे.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये कोणताही वाद-विवाद उद्भवला तर त्या तातडीने मिटवण्यामध्ये ते आघाडीवर आढळतात.लोकांना समजावून, समुपदेशन करून वाद कायमचा मिटवणे आणि प्रभागात शांततेचे वातावरण ठेवणे ही नेतृत्वाची खरी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.अनाथाश्रमातील मुलांना खाऊ, शालेय साहित्य, कपडे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते कायम पुढाकार घेतात. बालकल्याणाबद्दलची ही संवेदनशीलता त्यांना अधिक मानवी बनवते.
या सर्व उपक्रमांमुळे गणेश राऊत यांना प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांचा मोठा विश्वास प्राप्त झाला आहे. लोकांच्या कल्याणासाठी काहीतरी वेगळं करण्याची तीव्र इच्छाशक्ती, निस्वार्थ समाजसेवा आणि कार्यातून नेतृत्वाचा आदर्श देत ते आता जनता सेवेसाठी अधिक ठोस पावले उचलण्यास सज्ज आहेत.
- गणेश राऊत हे फक्त नाव नाही, तर निस्वार्थ सेवा, लोकाभिमुख काम आणि प्रामाणिक नेतृत्वाचा मानबिंदू.इंदापूरच्या विकासाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी जनता त्यांच्याकडून मोठी अपेक्षा ठेवून आहे आणि तेही “काम आधी, जाहिरात नंतर” या तत्त्वावर अविचल आहेत.



