इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी “शहा’ कुटुंबाच्या पाठिशी जनतेचा भक्कम विश्वास!

इंदापूर,दि.१
- इंदापूर शहरातील आगामी नगरपालिकेची निवडणूक जवळ येत असताना, शहरात राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे. विविध पक्षांची हालचाल सुरू असली तरी शहा कुटुंबाला मिळणारा वाढता जनाधार सध्या चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे.
इंदापूर शहराच्या विकासाच्या प्रवासात शहा कुटुंबाने दिलेलं योगदान अभूतपूर्व मानलं जातं. शहरातील प्रत्येक विकासकामात, सामाजिक उपक्रमात आणि नागरिकांच्या कल्याणासाठी शहा कुटुंबाचं सातत्यपूर्ण योगदान आहे.
इंदापूर नगरपालिकेच्या जनतेतून निवडून आलेल्या पहिल्या नगराध्यक्षा म्हणून कार्यभार सांभाळताना अंकिता मुकुंद शहा यांनी शहराला राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळवून दिले.स्वच्छ भारत अभियान, नगरपरिषद प्रशासनातील पारदर्शकता आणि नागरिकांसाठी केलेले अनेक सुविधा उपक्रम यामुळे इंदापूरने आदर्श नगरपालिकेचा दर्जा प्राप्त केला.त्यांच्या कार्यकाळात शहराच्या विकासाची नवी दिशा ठरवली गेली, असे नागरिकांमध्ये सर्वत्र मत व्यक्त केले जाते.
आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी शहरात सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे भरत (शेठ) शहा. शांत, संयमी आणि थेट जनतेशी नाळ जोडलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांच्या प्रामाणिक कामकाजामुळे आणि सर्व समाजघटकांशी जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे ते पक्षीय सीमांपलीकडे लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे असेल तर पक्ष नसेल तर अपक्ष मात्र इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष हे भरत (शेठ) शहा हेच होणार असा जनतेने निर्धार बांधल्याचे दिसून येत आहे.
भरत (शेठ) शहा यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे ‘विकासाच्या राजकारणावर विश्वास, संघर्षातही संयम आणि जनतेच्या अडचणींना तत्पर प्रतिसाद’. त्यांच्या या गुणांमुळे शहरातील तरुण वर्ग, व्यापारी समुदाय आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व स्तरांतून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
शहा कुटुंबाबद्दल नागरिकांचं एकमत असं की, “प्रामाणिक नेतृत्व, निष्कलंक प्रतिमा आणि इंदापूरच्या प्रगतीसाठी झटणारी मानसिकता” हीच त्यांची ओळख आहे.कोणताही भ्रष्टाचाराचा डाग नसलेलं हे नेतृत्व शहराच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहिलं आहे.
दुसरीकडे, विरोधकांकडून एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून मतभेद उफाळले आहेत. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शहा कुटुंबाची लोकप्रियता आणि नागरिकांचा वाढता विश्वास या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
आज, इंदापूर शहराच्या विकासाचा जो पाया आहे, त्यामागे शहा कुटुंबाची दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण काम आहे.विकासाच्या मार्गावर इंदापूरला नव्या उंचीवर नेण्याची ताकद या कुटुंबाकडे असल्याचं अनेक नागरिक सांगत आहेत.



