विशेष

इंदापूर तालुक्यात दुःखद घटना : शिक्रापूर येथे अपघातात निर-निमगाव मधील दोन तरुणांचा मृत्यू.

इंदापूर,दि १२

  • इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव येथील दोन तरुणांचा पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण निर-निमगाव गावावर शोककळा पसरली आहे.

मृत तरुणांची नावे राजू मारुती साळुंखे व सागर विलास जाधव अशी असून, दोघेही अत्यंत शांत व मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या अकाली निधनाने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघाताची बातमी समजताच निरनिमगावमध्ये शोकसागर उसळला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गावातील दोन्ही तरुणांच्या निधनामुळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!